Pune News : लाकडी पुलावरील मेट्रोच्या पुलाचे काम थांबवा : महापौरांचे आदेश

एमपीसी न्यूज – शहरात मेट्रोचे काम प्रगतीपथावर असून लकडी पूल, डेक्कन येथून मेट्रो मार्गाच्या पुलाचे काम चालू आहे. हा पूल लकडी पूलापासून 5.45 ते 6 मीटर इतका उंच आहे. मेट्रोच्या पूलाचा तळ व लकडी पूलाचा रस्ता म्हणजेच अंदाजे 20 फुट इतका उंच लकडी पूलावरून मेट्रोचा पूल झाल्यास शहरातील गणपती विसर्जन मिरवणूकीस मोठ्या प्रमाणात अडथळा होणार आहे. या बाबत बैठक घेण्यात येणार आहे, तोपर्यंत लकडी पुलावरील मेट्रोचे काम थांबवण्यात येईल, असा आदेश महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिले.

लकडी पुलावरून जाणाऱ्या मेट्रो उड्डाणपुलामुळे शहरातील पारंपरिक गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीला अडथळा निर्माण होणार आहे. या पुलाखालून विसर्जन मिरवणुकीचे रथ जाणार नाहीत.

यामुळे गणेश मंडळाचे कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. लकडी पुलावरील कामाच्या डिझाईन मध्ये बदल करावा यासाठी मागील दोन दिवसांपासून कार्यकर्ते मेट्रो, तसेच महापौर व प्रशासनाला पत्रव्यवहार करत आहेत. यानंतरही मेट्रोने नियोजनाप्रमाणे रात्रीच्या वेळी काम सुरू ठेवले आहे.

सभागृहात काँग्रेस गटनेते आबा बागुल, दीपक मानकर, विशाल धनवडे, दत्ता धनकवडे यांच्यासह सर्वच विरोधी पक्षांनी मेट्रो पुलामुळे विसर्जन मिरणवणुकीत निर्माण होणाऱ्या अडथल्याबाबत आंदोलन केले. यावर महापौर मुरलीधर मोहोळ यांनी येत्या दोन तीन दिवसांत मेट्रोचे मुख्य अधिकारी ब्रिजेश दीक्षित यांच्याशी चर्चा करून मार्ग काढण्यात येईल.

तोपर्यंत मेट्रो पुलाचे काम थांबवण्यात यावे,  असे आदेश मेट्रो प्रशासनाला देण्यात आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.