Pune : पुनीत बालन यांना पुणे महापालिकेचा दणका; तब्बल 3 कोटी 20 लाखांचा दंड

एमपीसी न्यूज : पुण्यामधील प्रसिद्ध उद्योजक पुनीत बालन यांना (Pune) पुणे महापालिकेने दणका दिलेला आहे. दहीहंडीच्या काळात प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरात संदर्भात  महापालिकेकडून कोणतीही परवानगी न घेतल्याने बालन यांना तब्बल तीन कोटी वीस लाख रुपयांचा दंड पालिकेने ठोठावला आहे.

पुण्यातील दहीहंडी मंडळ तसेच गणेशोत्सव मंडळांना पुनीत बालन यांच्याकडून आर्थिक मदत केली जाते. यासाठी जागोजागी  बालन ग्रुपच्या ऑक्सिरिच या पाण्याच्या बाटलीचे ब्रँडिंग करून घेतले जाते. हे प्रमाण प्रचंड असून प्रत्येक रस्ता चौक या ठिकाणी त्यांची जाहिराती दिसते.

यावेळी मात्र त्यांनी केलेली जाहिरात मात्र लोकांना आवडली नाही. कारण शनिवारवाड्याच्या परिसरात बुरूज दिसणार नाहीत (Pune) या पद्धतीने मोठ्या मोठ्या होर्डिंग लावून विद्रूपीकरण करण्यात आले होते. त्यामुळे या प्रकारावर नागरिकांकडून प्रचंड नाराजी व्यक्त केली गेली.

Nanded : नांदेडमध्ये 48 तासात तब्बल 35 जणांचा मृत्यू; तर 16 बालकांचा समावेश

सोशल मीडियावर झालेल्या विरोधाची दखल अखेर पुणे महानगर पालिकेने घेतली. या संदर्भात महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांच्याकडे देखील अनेकांनी तक्रारी आल्या. यावर सकारात्मक पाऊल उचलत पालिकेने बालन यांच्यावर दंड आकारला आहे.

 

https://www.youtube.com/watch?v=pKBjF3ikCxc

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.