Pune Murder : अनोळखी व्यक्तीच्या खुनाचा छडा अवघ्या सहा तासात; गुन्हे शाखा युनिट चारची कामगिरी

एमपीसी न्यूज : अवघ्या सहा तासात (Pune Police) अज्ञात व्यक्तीच्या खुनाचा तपास करण्यात पुणे गुन्हे शाखा युनिट चारला यश आले आहे. मयत व्यक्तीचे नाव संदिप शिंपी असे असून सतीश गिऱ्हे (रा. महाळुंगे)आणि दीपक कोळेकर (रा. बाणेर) या दोन आरोपींना खून प्रकरणी ताब्यात घेण्यात आले आहे.

चतु:श्रुंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 29 डिसेंबर रोजी सुसखिंड येथे निर्जन स्थळी एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला. या अज्ञात व्यक्तीचा आरोपींनी डोक्यात दगड घालून खून केला होता. पोलीस उपआयुक्त अमोल झेंडे यांनी घटनास्थळी दाखल होऊन तात्काळ गुन्हा उघडकीस आणला.

मयत व्यक्तीच्या डोक्यात दगड घातल्याने त्याच्या चेहऱ्याची ओळख पटत नव्हती. तसेच त्याची ओळख पटविण्यासाठी कोणतेही कागदपत्र अथवा इतर ठोस माहिती उपलब्ध नव्हती. तरी देखील मयत व्यक्तीची माहिती घेण्यासाठी पोलिसांनी बाणेर परिसर पिंजून काढला. पोलीस उपनिरीक्षक जयदीप पाटील व पोलीस अंमलदार अजय गायकवाड यांना मयत व्यक्तीची अचूक माहिती मिळाली. मयत व्यक्तीचे नाव संदीप शिंपी असे समजले. त्यानंतर संदीप शिंपी याला दोघांनी मोटरसायकलवर बसवून नेताना पाहिल्याची माहिती मिळाली.

Yerawada News : डॉल्बी वाजतोय जोरात; कल्याणी नगरमध्ये दोन हॉटेल्सवर कारवाई

या माहितीआधारे सतीश गिऱ्हे आणि दीपक कोळेकर यांना ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता त्यांनी शिंपी याच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची कबुली दिली. सतीश गिऱ्हे हा शिंपीच्या बायकोचा भाऊ असल्याचे निष्पन्न झाले. शिंपी दारू पिऊन सतत बायकोला मारहाण वा शिवीगाळ करत असे. तसेच गिऱ्हे याला देखील शिवीगाळ करत असल्याचा राग मनात ठेऊन गिऱ्हे आणि त्याचा साडू कोळेकर याने शिंपी याचा खून केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.