Pune : वृक्षप्रेमी महिलेने केले नारळाच्या झाडाचे ओटी भरण

एमपीसी न्यूज- झाडाला साडी नेसून, बांळतीणीसारखा शृंगार करून झाडाच्या ओटीभरणाचा आगळा वेगळा कार्यक्रम पुण्यात कर्वेनगर येथे झाला. वृक्षप्रेमी नीता यादवाड यांच्या संकल्पनेतून झालेल्या या कार्यक्रमाला यादवाड यांच्या मैत्रिणींनी देखील उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

कर्वेनगर भागात राहणाऱ्या नीता यादवाड यांनी काही वर्षांपुर्वी रत्नागिरीवरुन नारळाचे झाड आणून बंगल्यासमोरील बागेत लावले होते. परंतु आसपासच्या इमारतींमुळे त्या झाडाला पुरेसा सूर्यप्रकाश मिळत नव्हता. मग त्यांनी या झाडाचे दुसऱ्या ठिकाणी पुनर्रोपण केले. हे झाड जगेल की नाही याची यादवाड याना चिंता होती. मात्र काही दिवसातच झाड चांगले वाढू लागले. तीन आठवडयांपूर्वी त्याला तुर आल्याने नारळ लागण्यास सुरुवात होणार याचा नीता यादवाड यांना आनंद झाला.

हा आनंद साजरा करण्याची नामी कल्पना त्यांच्या डोक्यात आली. स्वत:च्या मुलासारखे वाढविलेल्या झाडाला यादवाड यांनी ओटी भरणाचा कार्यक्रम करण्याचा निर्णय घेतला. झाडाला बाळंतिणीसारखे साडी नेसवून सजवण्यात आले. मग ओटी भरण करून आनंद साजरा करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.