Pune : साध्वी प्रज्ञासिंहच्या निषेधार्थ पुण्यात राष्ट्रवादीचे आंदोलन

एमपीसी न्यूज – दहशतवाद्यांनी हेमंत करकरे यांना मारून माझे सुतक संपवले’ असे वादग्रस्त विधान करणाऱ्या साध्वी प्रज्ञासिंह यांच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज पुण्यातील बालगंधर्व चौकात आंदोलन केले. यावेळी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतन तुपे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी चेतन तुपे म्हणाले, साध्वी प्रज्ञासिंह यांच्या वक्तव्याने भाजपचा विकृत आणि घाणेरडा चेहरा जनतेसमोर आला आहे. भाजपवाल्यानी आजवर सत्तेसाठी नीच पातळी गाठली आहे. साध्वी प्रज्ञासिंह यांनीही आता त्यात उडी घेतली आहे. शहिदांना कंसवधाची उपमा देणाऱ्या भाजपला अजमल कसाब हा श्रीकृष्ण वाटतो का? याचे उत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला द्यावे, अशी मागणी तुपे यांनी यावेळी केली.

  • मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी असलेल्या साध्वी प्रज्ञासिंह यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपने त्यांना भोपाळ येथून लोकसभा निवडणुकीचे तिकीटही दिले आहे. दरम्यान, त्यांच्या या वक्तव्याने देशभरात खळबळ माजली असून मोठ्या प्रमाणात त्यांच्यावर टीका होत आहे.
MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
HB_POST_END_FTR-A2
You might also like