Pune : छुप्या युद्धाचा सामना करू- राजनाथ सिंह

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये 137 वा दीक्षांत समारंभ साजरा

एमपीसी न्यूज- पाकिस्तान पुरस्कृत होणारा दहशतवाद जगभर उघडकीस आला आहे. तो मोडून टाकण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुटनीतीमुळे यश आले आहे. पाकिस्तानकडून होणारे छुपे युद्ध (प्रॉक्सि वॉर) चा सामना करू. कोणताही देशाचा भूभाग बळकवणे हा आमचा उद्देश नाही पण आमच्या सीमेवर आक्रमण केले तर ते खपवून घेतले जाणार नाही असा इशारा केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिला.

पुण्यातील खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतील अर्थात एनडीएच्या 137 व्या तुकडीचा शानदार शिस्तबद्ध दीक्षांत समारोप संचलन सोहळा मोठ्या जल्लोषात पार पडला. तीन वर्षे खडतर परिश्रम घेऊन 260 विद्यार्थी देशसेवेसाठी सज्ज झाले. या दीक्षांत संचलनासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग उपस्थित होते. दीक्षांत समारंभाची पाहणी केल्यानंतर त्यांनी छात्रांना उद्देशून भाषण केले. यावेळी एनडीए मधील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

राजनाथ सिंह यांनी एनडीएमध्ये शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांचे अभिननंदन केले. तुमच्या हातून देशाची सेवा घडेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.