Pune : ग्रामीण भागातील पाणी आणण्याचे कष्ट वाचविण्यासाठी ‘नीर चक्र ‘

आधुनिक तंत्राद्वारे 'ट्री इनोव्हेटिव्ह फाउंडेशन ' देणार 25 कुटुंबाना मदतीचा हात

एमपीसी न्यूज- ग्रामीण भागातील पाणी आणण्याचे कष्ट वाचविण्यासाठी ट्री इनोव्हेशन फाउंडेशन तर्फे ‘नीर चक्र ‘ ही पाणी वाहून नेणारी आधुनिक ढकलगाडी दिली जाणार आहे . या आधुनिक तंत्राद्वारे ‘ट्री इनोव्हेटिव्ह फाउंडेशन ‘पुरंदर तालुक्यातील 25 गरीब कुटुंबाना मदतीचा हात दिला जाणार आहे . फाउंडेशनचे प्रमुख तन्वीर अस्लम इनामदार यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.

एका वेळी 80 लिटर पाणी वाहून देणाऱ्या या तीनचाकी ‘नीरचक्र ‘ ला वॉटर फिल्टर ,गायरोस्कोपिक स्टॅबिलायझर ,ब्रेक ,नळाची तोटी आहे .

महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ पी ए इनामदार यांनी या प्रकल्पासाठी 1 लाख रुपयांची मदत केली आहे .त्यांच्याच हस्ते ‘नीरचक्र ‘ वितरणाचा कार्यक्रम 18 ऑगष्ट रोजी,दुपारी 1 वाजता , झेंडेवाडी (पुरंदर ) येथे होणार आहे . तन्वीर पी . इनामदार यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.