Pune News : सामाजिक बहिष्काराची भीती दाखवून अडवली 400 लग्न, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा आरोप

एमपीसी न्यूज -सामाजिक बहिष्काराची भीती दाखवून  400 लग्न अडवल्याचा धक्कादायक आरोप अंधश्रद्धा निर्मूलन समितीने श्री गौड ब्राम्हण समाजात जातपंचायतीवर (Pune News) केला आहे. श्री गौड ब्राम्हण समाजात जातपंचायतीची मनमानी चालू असून आंतरजातीय विवाह करणे,पुनर्विवाह करणे अशा कायदेशीर गोष्टीच्या आड येवून जातपंचाच्या द्वारे संबंधित कुटुंबाना बहिष्कृत करणे दंड ठोठावणे असे बेकायदेशीर प्रकार सर्रास होत आहेत.

पत्रकार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत अंनिस (अंधश्रद्धा निर्मूलन समिती) ने हे आरोप  केले आहेत.यावेळी अंनिस (अंधश्रद्धा निर्मूलन समिती) च्या मुक्ता दाभोळकर, नंदिनी जाधव आणि मिलिंद देशमुख उपस्थित होते.

श्रीगौड ब्राम्हण जातीची महाराष्ट्रात काही हजार कुटुंबे आहेत. ह्या समाजाच्या बाहेर कुणी लग्न केले तर त्यांच्यावर जातपंचायती कडून सामाजिक बहिष्कार टाकला जातो. तसेच त्यांना परत जातीमध्ये घेण्यासाठी लाखो रुपये दंड त्यांच्या कडून वसूल केला जातो. अशा स्वरूपाच्या अनेक तक्रारी महाराष्ट्र अंनिस कडे दाखल झाल्या आहेत.ह्या जातपंचायतींच्या मनमानीला चाप बसवण्या विषयी पोलिसांच्या कडून दिरंगाई होत आहे, असा आरोपही अंनिस ने केला.

Shubman Gill : एकदिवसीय सामन्यात शुभमनने झळकवलं द्विशतक; सचिनचाही मोडला रेकॉर्ड

जातपंचायत मनमानी आणि सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा करणारे महाराष्ट्र पहिले राज्य असून आपल्या इथे त्या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी केली जात नाही, अशी टीकाही यावेळी करण्यात आली.महाराष्ट्रात असलेल्या सामाजिक बहिष्कार कायद्याच्या अंतर्गत तातडीने या विषयी कारवाई केली जावी, अशी मागणी अंनिस(Pune News) ने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.