Pune : कैलास स्मशानभूमीतील एक विद्युत दाहिनी दहा दिवस राहणार बंद

एमपीसी न्यूज – देखभाल दुरुस्तीसाठी (Pune) पुण्यातील संगमवाडी परिसरातील कैलास स्मशान भूमीतील विद्यूत दाहिनी क्रमांक एक ही 21 जानेवारी ते 31 जानेवारी या दहा दिवसांच्या कालावधी दरम्यान बंद राहणार आहे, अशी माहिती पुणे महापालिकेच्या विद्यूत विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.
Shubman Gill : एकदिवसीय सामन्यात शुभमनने झळकवलं द्विशतक; सचिनचाही मोडला रेकॉर्ड
महापालिकेने म्हटले आहे की, नागरिकांची (Pune) गैरसोय होऊ नये, यासाठी स्मशानभूमीतील दुसरी विद्युत दाहिनी चालू राहणार असून ए.पी.सी.सिस्टमची सुविधा देखील उपलब्ध असणार आहे. तरी नागरिकांनी यांची नोंद घ्यावी, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. दुरुस्तीनंतर विद्युत दाहिनी पुन्हा पूर्ववत चालू होणार आहे.