Pune News : अभिमान गीताचे देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या काळात पुणेकरांनी केलेल्या मदतीप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने ‘अभिमान पुण्याचा’ ही मोहीम सुरू आहे. या मोहिमेअंतर्गत तयार करण्यात आलेल्या ‘पुन्हा एकदा साथ आले…’ या अभिमान गीताचे अनावरण विधानसभेतील विरोधी पक्ष नेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज पुण्यात करण्यात आले.

या प्रसंगी पक्षाचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, महापौर मुरलीधर मोहोळ, सभागृह नेते गणेश बिडकर, स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने उपस्थित होते. पुण्यातील सेवाव्रतींचा या गीतातून केला गेलेला गौरव औचित्यपूर्ण असल्याचे उद्गार देवेंद्र फडणवीस यांनी या वेळी काढले.

या मोहिमेद्वारे शहर भाजपने आपली पालकत्वाची भूमिका निभावली असल्याचे सांगून फडणवीस यांनी भाजपा काऱ्यांचे अभिनंदन केले. वरुण नार्वेकर यांनी दिग्दर्शित केलेले हे गीत क्षितिज पटवर्धन यांनी लिहिले असून, जसराज जोशी यांनी गायले आहे. जसराज जोशी व सौरभ भालेराव यांनी संगीतबद्ध केलेल्या या गीताची मध्यवर्ती संकल्पना ‘सेतू अ‍ॅडव्हर्टायझिंग’चे संचालक ऋग्वेद देशपांडे यांची आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.