Maharashtra Corona Update : राज्यात आज 9,361 नवे रुग्ण, 9,101 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज : – महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून दहा हजारांहून कमी कोरोना बाधित रुग्णांची नोंद होत आहे. आज (रविवारी) दिवसभरात राज्यात 9 हजार 361 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली तर, 9 हजार 101 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.

महाराष्ट्रातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 59 लाख 72 हजार 781 एवढी झाली आहे. त्यापैकी 57 लाख 19 हजार 457 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. आजघडीला राज्यात 1 लाख 32 हजार 241 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आरोग्य विभागाने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.

राज्यात आज 190 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आजवर 1 लाख 17 हजार 961 रुग्ण मृत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 1.97 टक्के एवढा आहे. तर, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.76 टक्के एवढे झाले आहे.

राज्यात आतापर्यंत 3 कोटी 95 लाख 14 हजार 850 नमूने तपासण्यात आले आहेत. राज्यात सध्या 7 लाख 96 हजार 297 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 4 हजार 683 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

Total
0
Shares
Related Posts
Total
0
Share