Pune News : कोलकाता आणि मुंबई नंतर आता पुणे मेट्रोने केलीये ही कामगिरी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या मेट्रो मार्गातील शिवाजीनगर ते स्वारगेट या भुयारी मार्गाचे काम आता शिवाजीनगरपर्यंत आले आहे. दिवाणी न्यायालयाच्या पुढे हा मार्ग भुयारी असून तो पुढे मुठा नदी ओलांडून पुढे मंडई व स्वारगेट असा आहे. नदी खालून बोगद्याचे काम पुण्यात प्रथमच होत असून कोलकाता आणि मुंबई नंतर देशात नदीखाली बोगद्याचा हा तिसरा प्रयोग आहे.

मेट्रो च्या शिवाजीनगर ते स्वारगेट या भुयारी मागार्चा मुठा नदीखालच्या भागाचे काम पुर्ण झाले. खोदकाम करणारे टीबीएम आता नदीपार करून पूढे गेले आहे. नदीच्या तळाखालून 13 मीटर खोलीवर हा बोगदा आहे. नदीपुढे आता कसबा पेठेतील महापालिकेच्या दादोजी कोडदेव शाळेकडे खोदकाम सुरू होईल.

शिवाजीनगर ते स्वारगेट या मार्गावर मुठा नदी आणि त्यापुढे दाट लोकवस्तीचा भाग आहे. त्यामुळे या भागातून मेट्रो नेण्यासाठी भुयारी पध्दतीचा अवलंब करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मुठा नदीवर अनेक पूल आहेत. त्यातील काही तर शतकापूर्वी बांधलेले आहेत. मात्र, मुठा नदीखालील हा पहिलाच बोगदा आहे, असे पुणे मेट्रोचे जनसंपर्क अधिकारी हेमंत सोनवणे यांनी सांगितले.

शिवाजीनगर ते बुधवार पेठ मेट्रो स्टेशनच्या मार्गावर दोन भुयारी मार्ग आहेत. यातील एक 240 मीटरचा तर दुसरा 223 मीटरचा आहे. मुठा नदीखालील बोगदा पूर्ण करण्यासाठी एक महिन्याहून अधिक काळ लागला.

या कामात कोणताही अडथळा आला नाही. स्वारगेटच्या बाजुनेही एका बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे. स्वारगेट ते मंडई या दरम्यान हा 480 मीटरचा बोगदा आहे. त्याचबरेबर कृषि महाविद्यालय ते शिवाजीनगर कोर्ट या दरम्यान 1.6 किलोमीटरच्या मार्गाचा बोगदा पूर्ण झाला आहे.

या मार्गावरील शिवाजीनगर रेल्वे स्टेशन आणि शिवाजीनगर कोर्ट या दोन स्टेशनच्या दरम्यानचा हा बोगदा पूर्ण झाला आहे. फडके हौद स्टेशनपर्यंतच्या बोगद्याचे काम सध्या सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.