Pune news: ‘यामुळे’ उपाध्याय यांना अभिवादन करणारे ट्वीट डिलीट केले; अजित पवारांनी केला खुलासा

एमपीसी न्यूज – उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी भारतीय जनसंघाचे सहसंस्थापक पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करणारे ट्वीट केले होते. पण, काही तासांनंतर अजितदादांनी ते ट्वीट केले. त्यामुळे उलटसुलट चर्चेला उधाण आले होते. त्यावर आता अजितदादांनी खुलासा केला आहे. समाजकारण, राजकारण करत असताना वरिष्ठांच्या गोष्टी ऐकाव्या लागतात. त्यामुळे ट्वीट डिलीट केल्याचे त्यांनी सांगितले.

भारतीय जनसंघाचे सहसंस्थापक, जेष्ठ नेते स्वर्गीय पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन! असे ट्वीट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी केले होते. मात्र काही तासांनंतर अजित पवारांकडून हे ट्वीट डिलीट करण्यात आले आहे. त्यामुळे अजितदादांनी दीनदयाळ यांना अभिवादन करणारे ट्वीट डिलीट का केले? अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या.

याबाबत पुण्यात पत्रकारांनी अजितदादांना विचारले असता ते म्हणाले, एखादी गोष्ट केली की त्याची चर्चा होते. आपण हयात नसलेल्या व्यक्तीबाबत चांगले बोलतो. त्या पद्धतीने ट्वीट केले होते. समाजकारण, राजकारण करत असताना वरिष्ठांच्या गोष्टी ऐकाव्या लागतात. त्यामुळे ट्वीट डिलीट केले. पण, माझ्या दृष्टीने कोरोनाचे संकट, शेतकरी या विषयांना प्रधान्य आहे. त्या गोष्टी सोडविण्याला मी जास्त प्राधान्य देतो.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.