Pune News: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची किल्ले स्पर्धा यंदा नाही

एमपीसी न्यूज : दिवाळीनिमित्त महापलिकेच्या उद्यान विभागातर्फे आयोजित करण्यात येणारी किल्ले स्पर्धा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होणार नाही. लहान मुलांचे लसीकरण झाले नसल्याने किल्ले स्पर्धा रद्द करण्यात आली आहे. पुणे महानगरपालिका व वृक्षप्राधिकरणाच्या वतीने दरवर्षी दिवाळीनिमित्त संभाजी बागेच्या परिसरात किल्ले तयार करण्याच्या स्पर्धा व प्रदर्शनाचे आयोजन केले जाते.

ही स्पर्धा पंचवीस वर्षापेक्षा जास्त वर्षापासून महापालिकेकडून आयोजित केली जाते. या स्पर्धेत शहरातील विविध वयोगटातील मुलांकडून तीस ते चाळीस विविध किल्ल्यांच्या प्रतिकृती तयार केल्या जातात. यामध्ये या प्रदर्शनात रायगड, सिंहगड, जंजीरा, प्रतापगड, पुरंदर, विजयदुर्ग असे अनेक किल्ले पाहायला मिळतात. या ठिकाणी त्या किल्ल्याची माहिती तसेच शिवाजी महाराजांच्या शौर्याची कहाणीची माहिती दिली जाते.

मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षी ही स्पर्धा घेतली नाही. यंदा कोरोनाचा संसर्ग बर्‍यापैकी कमी झाल्याने शासनाकडून टप्प्या टप्प्याने शिथीलता दिली जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर महापालिकेची किल्ले स्पर्धा आयोजित केली जाणार की नाही, याबाबत किल्लेप्रेमींमध्ये उत्सुकता होता. मात्र, कोरोनाच्या तीसर्‍या लाटेची शक्यता लक्षात घेवून आणि लहान मुलांचे लसीकरण अद्याप झालेले नसल्याने यंदाही किल्ले स्पर्धा आयोजित करण्यात येणार नसल्याचे महापालिकेच्या उद्यान विभागाचे प्रमुख अशोक घोरपडे यांनी स्पष्ट केले आहे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.