Pune News: गणेशोत्सव आला तरी ‘अमोनियम बायकाबोर्नेट’ दाखल नाही

पुणे महापालिकेच्या स्थायी समितीने मंजुरी दिल्यानंतर तब्बल 33 लाख 44 हजार रूपयांचे दीडशे टन ‘अमोनियम बायकाबोर्नेट’ राष्ट्रीय केमिकल्स अ‍ॅण्ड फटीलायझर्स लि़. या कंपनीकडून मागविण्यात आले आहे.

एमपीसी न्यूज – पुणे शहरात कोरोनाचे संकट गंभीर झाल्याने घरगुती गणपतींचे घरातच विसर्जन करावे, असे आवाहन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केले आहे. मात्र, प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती पाण्यात विरघळण्यासाठी ‘अमोनियम बायकाबोर्नेट’ चा पुरवठाच अद्याप शहरात झालेला नाही.

गणेशोत्सव आला असताना, दीड दिवसाच्या गणपतींचे विसर्जन करणाऱ्या नागरिकांसाठी अद्यापही महापालिकेच्या क्षेत्रिय कार्यालय, आरोग्य कोठी आणि गणेश मूर्ती विक्रेत्यांकडेही हे ‘अमोनियम बायकाबोर्नेट’ उपलब्ध झाले नाही.

पुणे महापालिकेच्या स्थायी समितीने मंजुरी दिल्यानंतर तब्बल 33 लाख 44 हजार रूपयांचे दीडशे टन ‘अमोनियम बायकाबोर्नेट’ राष्ट्रीय केमिकल्स अ‍ॅण्ड फटीलायझर्स लि़. या कंपनीकडून मागविण्यात आले आहे.

गुरुवारी दोन गाड्या कंपनीतून निघाल्या आहेत. पुणे पालिकेकडील ‘अमोनियम बायकाबोर्नेट’च्या शिल्लक साठ्यामध्ये पन्नास किलोच्या दोनशे गोनी आहेत. यांचे वाटप दीड दिवसांच्या गणपतींच्या घरातील विसर्जनाकरिता करण्यात येणार आहे, असे कचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख ज्ञानेश्वर मोळक म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.