_MPC_DIR_MPU_III

Pune News : महावितरण विरोधात भाजपचे टाळा ठोको हल्लाबोल आंदोलन !

एमपीसी न्यूज : महावितरणाने 75 लाख वीज ग्राहकांना कनेक्शन तोडण्याची नोटीस पाठवून महाराष्ट्रातील 4 कोटी जनतेला अंधारात टाकण्याचे पाप करणाऱ्या महावितरणाच्या निषेधार्थ कसबा मतदार संघाच्या वतीने सदाशिव पेठेतील पेशवे पार्क महावितरण ऑफिसला टाळा ठोको हल्लाबोल आंदोलन करण्यात आले.

_MPC_DIR_MPU_IV
_MPC_DIR_MPU_II

महावितरण विरोधात भाजपकडून महाराष्ट्रभर आंदोलन करण्याचा इशारा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस तसेच सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्व जिल्ह्यांमध्ये आंदोलन करण्याचे आदेश दिले आहेत.

त्यानुसार आज शुक्रवारी कसबा मतदार संघामध्ये खासदार गिरीष बापट व आमदार मुक्ता टिळक यांच्या मार्गदर्शनाखाली कसबा मतदार संघाचे अध्यक्ष प्रमोद कोंढरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले. यावेळी छगन भुलाखे, राजेंद्र काकडे, राणी कांबळे, महिला अध्यक्ष अश्विनी पांडे, युवा मोर्चा अध्यक्ष अमित कंक, प्रचार प्रासिद्धी प्रमुख पुष्कर तुळजापूरकर आदी पदाधिकारी सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी आणि स्वीकृत नगरसेवक उपस्थित होते.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.