Pune news : सरकारी धान्याचा काळाबाजार करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद

एमपीसी न्यूज – सरकारी धान्याचा काळाबाजार करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद करण्यात आली असून त्यांच्याकडून एकूण 12.73 लाख रूपये किंमतीचे सरकारी धान्य जप्त (Pune News) करण्यात आले आहे.
मंगळवार, 3 जानेवारी 2023 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे घाडगे यांना बातमी मिळाली, की यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदेशीरपणे रेशनच्या धान्याची अफरातफर करून चोरून वाहतूक व विक्री केली जात आहे. आज 4 जानेवारी 2023 रोजी पहाटे 4 वाजता स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तसेच यवत पोलीस स्टेशनचे अधिकारी-कर्मचारी व पंच यांनी यवत पोलीस स्टेशन हद्दीतील कासुर्डी टोलनाका येथे जाऊन सापळा रचला. मिळालेल्या बातमी प्रमाणे, पुणे बाजूकडून येणाऱ्या माल वाहतूक टेम्पोंना पकडण्यात त्यांना यश आले.

ही कारवाई ही पोलीस अधिक्षक अंकीत गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, पोलीस उपअधीक्षक राहुल धस, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे, सचिन घाडगे, असिफ शेख, अजित भुजबळ,  विजय कांचन, अजय घुले, धिरज जाधव (Pune News) यांनी केली आहे .

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.