Pune News : खडूवर कोरीव काम करणाऱ्या नववीतील चैतन्य भुजबळची ‘इंडिया बूक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये नोंद

एमपीसी न्यूज – इयत्ता नववीच्या वर्गात शिकणाऱ्या पुण्याच्या चैतन्य भुजबळ या विद्यार्थ्याची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस् मध्ये नोंद करण्यात आली आहे. खडूवर कोरीव काम करून त्यापासून विविध कलाकृती चैतन्यने तयार केल्या आहेत. त्याच्या या अनोख्या कलेची दखल इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसने घेतली आहे.

चैतन्य सहावीत असल्यापासून ही कला जोपासत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉक डाउनमध्ये त्याने याबाबत आणखी काम करत वेगवेगळ्या कलाकृती केल्या यामध्ये खडूपासून साखळी तयार करणे, गणपती अशा कलाकृती त्याने केल्या आहेत.

लॉकडाऊन दरम्यान चैतन्यने या रेकॉर्डसाठी अर्ज केला होता त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद आल्यानंतर त्याने सुरवात केली व त्यात यश मिळाले. त्याच्या या अनोख्या काळे बद्दल आणि यशाबद्दल त्यांच्या कुटुंबियांनी आनंद व्यक्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.