Pune News : अवैधरित्या वास्तव्य करणा-या येमेन देशाच्या 6 नागरिकांवर डिपोर्टेशनची कारवाई

एमपीसी न्यूज : पुणे पोलिसांच्या विशेष शाखेच्या (Pune News) प्रॉसिक्युशन ॲन्ड व्हिजीलन्स सेलकडून पासपोर्ट व व्हिसाशिवाय अवैधरित्या वास्तव्य करणा-या येमेन देशाच्या 06 नागरिकांवर कारवाई करण्यात आली आहे. हे सहा जण कोंढवा परिसरात वास्तव्यास होते. नागरिक नोंदणी शाखेच्या पथकाने ऑक्टोबर महिन्यात ताब्यात घेतले होते.

यामध्ये दोन पुरुषअल्खराज अतेक (वय 37), श्र्वाकी खररज (वय 34) यासह महिला नामे हेबा हुसेन व तीन अल्पवयीन मुलांचा समावेश होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे सर्व नागरिक विद्यार्थी व्हिसावर भारतात आले होते आणि सन 2017 पासून भारतात अवैधरित्या वास्तव्य करत होते. सदर नागरिकांना एफ. आर. ओ कार्यालयाने ताब्यात घेतल्यानंतर दोन पुरुष नागरिकांना कोंढवा पोलिस स्टेशन हद्दीत देखरेखीखाली ठेवण्यात आले. तर, महिलेला तीच्या तीन अल्पवयीन मुलांसोबत हडपसर रेस्क्यु फाऊंडेशन येथे देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.

Pune : जयस्तंभ अभिवादन सोहळा सर्वांनी मिळून यशस्वी करावा – जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख

या सर्व जणांचे नवीन पासपोर्ट मुंबईस्थित येमेन देशाच्या दुतावासाकडून प्राप्त करुन घेण्यात आले. येमेन परकिय नागरिकांना त्यांच्या मुळ देशात पाठविण्यात येणार होते. परंतु, सदर येमेन देशाच्या नागरिकांचा डिपोर्टेशन व येमेन येथे जाण्यास विरोध होता.

मुंबईस्थित येमेन दुतावासाच्या मदतीने त्यांचे विमान (Pune News) तिकीट आरक्षित करण्यात आले. येमेन येथे जाण्यास सदर नागरिकांचा विरोध असल्याने मोठ्या शिफातीने येमेनी नागरिकांना अखेर मुंबई विमानतळ येथे नेऊन हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.