Pune News : पुणे महापालिकेत समाविष्ट केलेल्या 23 गावांचा विकास निसर्ग समितीच्या निगराणीखाली करावा – माय अर्थ फाऊंडेशन

एमपीसी न्यूज – पुण्यातील राज्यकर्त्यांची काम करायची पद्धत पाहता पुण्यात पर्यावरणाची हानी करून अनेकजागी विकास केला जात आहे. पुण्यातील कचऱ्याचा प्रश्न आजही तसाच असून डंप यार्ड ला डोंगर उभे आहे, ट्रॅफिक समस्या, मोठे फुटपाथ, चांगल्या रस्त्यांचे खोदाई करून लावलेली वाताहत, बिल्डर लोकांसाठी अनधिकृत होणारी वृक्षतोड, अनेक वर्षे प्रलंबित असलेला मुठा नदी चा प्रोजेक्ट, अकार्यक्षम सुवेज ट्रीटमेंट प्लांट, बंद असलेले बायोगॅस प्रकल्प, दुर्लक्षित ड्रेनेज व्यवस्थापन असे अनेक उदाहरणे आहेत.

अनधिकृतपणे कारवाई केलेला आंबील ओढा सरळीकरण हा विषय नुकताच राज्यभर गाजलेला असून ही बाब पण महत्वाची आहे.

मुख्यमंत्र्यांनी नुकत्याच निर्माण केलेल्या राज्यस्तरीय निसर्ग समिती च्या माध्यमातून पुण्यातील या 23 गावांचा विकास केला जावा अशी विनंती माय अर्थ फाऊंडेशनने मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली आहे. सदर गावांमध्ये आजही निसर्गसंपदा, जैवविविधता, ओढे, नाले, अस्तित्वात आहेत तिथे विकास करीत असताना ह्या सर्व गोष्टींचा विचार होणे गरजेचे आहे.

23 गावांचा विकास करीत असताना होणारा डेव्हलपमेंट प्लॅन वर निसर्गसमिती तसेच काही पर्यावरणीय संस्था, नागरी समिती यांचा ही सहभाग असावा असे आम्हाला वाटते.

आपण महाराष्ट्राचे प्रथम नागरिक या नात्याने सदर विषयात लक्ष घालून सुंदर शहराचे होणारे भकासिकरण थांबवावे आणि पर्यावरण पूरक विकास व्हावा, अशी आमची अपेक्षा आल्याचे माय अर्थ फाऊंडेशनचे अध्यक्ष अनंत रामचंद्र घरत म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.