Pune News : सॅलिसबरी पार्कमधील नागरिकांचे प्रश्न सोडविण्याचे फडणवीस यांचे आश्वासन

एमपीसी न्यूज – भाजपचे नगरसेवक श्रीनाथ भिमाले यांच्या वडिलांच्या नावावर असलेल्या सॅलिसबरी पार्कच्या बागेत चार आठवड्यांपासून सुरू असलेल्या वादग्रस्त विषयाची आपल्याला माहिती असल्याची ग्वाही देऊन देवेंद्र फडणवीस यांनी सॅलिसबरी पार्क रेसिडेंट्स फोरम (SPRF) च्या सदस्यांना तत्काळ मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.

 

गोपेश मेहता यांच्या नेतृत्वाखालील SPRF च्या सदस्यांनी, ज्यांनी निवासी कारणांसाठी आरक्षित केलेले उद्यान आरक्षण परत आणण्यासाठी सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा दिला होता, त्यांनी फडणवीस यांची भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेत भेट घेतली जिथे ते पुस्तक प्रकाशनासाठी प्रमुख पाहुणे होते. मेहता यांनी फडणवीस यांना विनंती केली की, ”बागेची जमीन परत मिळविण्यासाठी नागरिकांच्या 40 वर्षांच्या संघर्षाला न्याय द्यावा.” फडणवीस म्हणाले, ”मला या समस्येची जाणीव आहे. मी भिमाले यांच्याशी याआधी बोललो आहे आणि आज लगेच बोलून हा प्रश्न सोडवू.”

 

फडणवीस यांनी यापूर्वी दोनदा सकारात्मक प्रतिसाद दिला आहे, ”मी या प्रकरणाकडे लक्ष देत आहे, असल्याचे फडणवीस यांनी सांगितले होते. दरम्यान, एसपीआरएफ सार्वजनिक मोहिमेला पुढे नेण्यासाठी नागरिक तयारी करीत आहेत. एसपीआरएफचे अध्यक्ष फैजल पूनावाला म्हणाले की ”या सार्वजनिक उद्यान चळवळीसाठी लढणे ही स्वाभिमानाची बाब आहे.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.