Pune News : माजी पोलीस आयुक्त धनंजय जाधव यांच्यावर उपचार सुरु असताना निधन

एमपीसी न्यूज – पुणे आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त धनंजय जाधव यांचे वयाच्या 74 व्या वर्षी निधन झाले. अपोलो रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचार सुरू असतानाच त्यांचे सोमवारी रात्री निधन झाले.

मागील काही दिवसांपासून त्यांना हृदयाच्या आजाराचा त्रास होता. यावर उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा आणि दोन मुली आहेत. साताऱ्यातील पुसेगाव याठिकाणी त्यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार आहेत.

1972 साली ते युपीएससीची परीक्षा पास झाले. त्यानंतर आयपीएस म्हणून धुळे येथे रुजू झाले. आजचा नंतर वर्धा नगर पुणे महामार्ग या ठिकाणी पोलिस अधीक्षक म्हणून त्यांनी काम केले. 2004 ते 2007 या काळात ते पुण्याचे पोलिस आयुक्त होते. 2007 ते 2008 या काळात त्यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून कामकाज पाहिले. त्यानंतर ते निवृत्त झाले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.