India Corona Update : महाराष्ट्रासह आठ राज्यात सर्वाधिक रुग्णवाढ, देशात 24 तासांत 56,211 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रासह देशातील आठ राज्यात कोरोना रुग्णांची सर्वाधिक वाढ होत आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 56 हजार 211 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी 85 टक्के रुग्ण अवघ्या आठ राज्यातील आहेत. महाराष्ट्रात सोमवारी 31,643 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली.

आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1 कोटी 20 लाख 95 हजार 855 एवढी झाली आहे. त्यापैकी 1 कोटी 13 लाख 93 हजार 021 जण कोरोनामुक्त झाले आहेत. गेल्या 24 तासांत 37 हजार 028 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. देशात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.18 टक्के एवढं झाले आहे.

देशात सध्या 5 लाख 40 हजार 720 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. मागील 24 तासांत 271 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आतापर्यंत 1 लाख 62 हजार 114 जण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.34 टक्के एवढा आहे‌.

आयसीएमआरने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशात आजवर 24 कोटी 26 लाख 50 हजार 025 नमूने तपासण्यात आले आहेत. त्यापैकी 7 लाख 85 हजार 864 चाचण्या सोमवारी (दि. 29) करण्यात आल्या आहेत.

लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत आतापर्यंत देशात 6 कोटी 11 लाख 13 हजार 354 जणांना कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.