Pune Crime News : ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर देण्याच्या बहाण्याने महिलेची 19.48 लाखांची फसवणूक 

एमपीसी न्यूज – ऑनलाईन वैद्यकीय साहित्य विक्री करणा-या महिलेला 20 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर देण्याच्या बहाण्याने  19.48 लाखांची फसवणूक करण्यात आली.  या प्रकरणी गोरेगाव येथील कंपनी मालकाच्या विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

या प्रकरणी तीस वर्षीय महिलेनं मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रोपरायटर ग्लोबल इएमपी ॲन्ड पार्टनर्स या कंपनीच्या मालकाविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ऑनलाईन वैद्यकीय साहित्य विक्री करण्याचा व्यवसाय करतात. आरोपी कंपनीच्या मालकांनी फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून वीस ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर देण्याच्या बहाण्याने त्या महिलेकडून 19.48 लाख रुपये घेतले. त्याबदल्यात ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन न देता त्यांची  फसवणूक केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.