Bhosari Crime News : बँकेत पैसे भरण्यासाठी मदत करण्याच्या बहाण्याने तरुणाकडील रोकड लंपास

एमपीसी न्यूज – बँकेत पैसे भरण्यासाठी मदत करण्याच्या बहाण्याने एका अनोळखी व्यक्तीने तरुणाकडील 70 हजार रुपयांची रक्कम पळवली. ही घटना सोमवारी (दि. 5) सकाळी दहा वाजता इंद्रायणीनगर येथील युनियन बँकेत घडली.

संजीत रामाशंकर गुप्ता (वय 18, रा. धावडे वस्ती, भोसरी) यांनी याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी इसमाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गुप्ता हे सोमवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास युनियन बँक इंद्रायणी नगर शाखेत पैसे भरण्यासाठी आले होते. त्यावेळी आरोपीने फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडील 70 हजार रुपये रक्कम मोजण्यासाठी तसेच बँकेत भरण्याच्या बहाण्याने घेतली. त्यानंतर ते पैसे बँकेत न भरता आरोपी निघून गेला.

फिर्यादी यांचा विश्वासघात आणि रकमेचा अपहार केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.