Pimpri Vaccination News : कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची शहरातील सर्व केंद्रे बुधवारी बंद
एमपीसी न्यूज – लसीकरण कामकाजाची साप्ताहिक सुट्टी असल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेची सर्व कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्रे उद्या (बुधवारी) बंद राहणार असल्याचे महापालिकेने कळविले आहे.
पिंपरी-चिंचवड शहरामध्ये आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 व भारतीय साथरोग अधिनियम 1988 अन्वये कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहे. कोविड 19 या आजारावर केंद्र शासन व राज्य शासनाच्या प्राप्त मार्गदर्शक सुचनांप्रमाणे 16 जानेवारी 2021 पासून आरोग्य कर्मचारी (HCW), 2 फेब्रुवारी पासून आघाडीचे कर्मचारी (FLW), 1 मार्च पासून 60 वर्षावरील नागरिकांचे लसीकरण तसेच 1 एप्रिल 2021 पासून 45 वर्षावरील नागरिकांचे लसीकरण आणि 1 मे पासून 18 ते 44 वयोगटातील सर्व नागरिकांचे कोविड लसीकरण करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
शासन मार्गदर्शक सूचनांनुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर नागरिकांचे कोविड 19 लसीकरण करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. उद्या (बुधवारी) लसीकरण कामकाजाची साप्ताहिक सुट्टी करण्यासाठी महापालिकेची सर्व लसीकरण केंद्रे बंद राहणार आहेत.