Pune News: चपातीत विष घालून शेळीचा खून, शेजारी महिलेवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज: शेजारी राहणाऱ्या महिलेने चपातीच विष घालून शेळीचा मृत्यू घडवून आणल्याचा प्रकार उघडकीस आलाय. हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील महात्मा फुले वसाहतीजवळ शनिवारी हा प्रकार घडला. एका 66 वर्षीय महिलेने या प्रकरणी तक्रार दिली असून या महिलेच्या घराशेजारीच राहणाऱ्या एका महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी अधिक माहिती, आरोपी आणि फिर्यादी हे शेजारी शेजारी राहण्यासाठी आहेत.. फिर्यादी कडे एक शेळी होती. आरोपीने चपाती मध्ये कोणतेतरी विषारी औषध घालून ही चपाती शेळीला खायला दिली. ही चपाती खाल्ल्याने शेळीचा मृत्यू झाला. तक्रार आल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला. शवविच्छेदनासाठी शेळीचा मृतदेह पाठवण्यात आला आहे. नेमकं कुठल्या कारणावरून शेळीचा मृत्यू घडवून आणला, मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही. हडपसर पोलीस अधिक तपास करत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.