Sangavi News : स्पा सेंटरमध्ये वेश्याव्यवसाय ; 8 महिलांची सुटका, स्पा मॅनेजरला अटक

एमपीसी न्यूज – स्पा सेंटरमध्ये वेश्याव्यवसाय चालवणा-या स्पा मॅनेजरला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ब्रिडल स्पा ॲंड ब्युटी, शाहु पॅलेस, किर्ती नगर, नवी सांगवी येथे सामाजिक सुरक्षा पथकाने शुक्रवारी (दि.31) ही कारवाई केली. या कारवाईत 8 महिलांची सुटका करण्यात आली आहे.

शेख लतीफ निजाम ( वय 27, रा. काळेवाडी, मुळगाव लातूर) असे अटक स्पा मॅनेजरचे नाव आहे. तसेच स्पा सेंटरचा चालक मालक पार्थ सारथी महंती (वय 35, रा. शाहु पॅलेस, किर्ती नगर, नवी सांगवी, मुळगाव- ओडिशा) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस नाईक संगीता रामनाथ जाधव यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी ब्रिडल स्पा ॲंड ब्युटी या स्पा सेंटरमध्ये वेश्याव्यवसाय चालवत, आठ महिलांच्या कडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करुन घेतला. सामाजिक सुरक्षा पथकाने शुक्रवारी या स्पा सेंटरवरती छापा टाकून आठ मुलींची सुटका करत मॅनेजरला ताब्यात घेतले आहे. तिथून 23 हजार 337 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सांगवी पोलीस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.