Chakan News : चाकण मधून एक ट्रक, एक ट्रॅक्टर चोरीला ; शहरात दुचाकी चोरीच्या तीन घटना

एमपीसी न्यूज – चाकण परिसरातून एक ट्रक आणि एक ट्रॅक्टर चोरीला गेला आहे. तसेच, शहराच्या इतर भागातून तीन दुचाकी चोरीला गेल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

 

ट्रक चोरीची घटना वाकी बुद्रुक, गारगोटे शिवार, खेड येथे घडली. याप्रकरणी भक्ती सुदाम गारगोटे (वय 40, रा. वाकी बुद्रुक, गारगोटे) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोकळ्या जागेत उभा केलेला दहा लाख रुपयांचा ट्रक अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

कडाची वाडी, येथून 30 डिसेंबर रोजी ट्रॅक्टर चोरीला गेला आहे. याप्रकरणी रामदास मारुती कठाळे (वय 30, रा. कडाची वाडी, मुळगाव बीड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनिल नारायण काकडे (रा. बीड) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांचा विश्वास संपादन 50 हजार रुपये व पाच लाख रुपये किंमतीचा ट्रॅक्टर चोरुन नेला आहे.

तसेच, शहरातून भोसरी आणि पिंपरी येथून तीन दुचाकी चोरीला गेल्या आहेत. याप्रकरणी जितेंद्र गणपत गोसावी (वय 27, रा. भोसरी) यांनी भोसरी, चंद्रकांत सुदाम फलके (वय 52, रा. चिखली) यांनी पिंपरी, महेंद्र यादव (वय 21, रा. पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.