Pune News : आरोग्यमंत्री टोपे पटवून देणार इंदोरीकर महाराजांना लसीचे महत्व

एमपीसी न्यूज – ‘मी कोरोनाची लस घेतली नाही आणि घेणारही नाही,’ असे वक्तव्य निवृत्ती महाराज देशमुख यांनी नाशिकमध्ये एका किर्तनात केले होते. त्यावर आरोग्यमंत्री टोपे यांना पत्रकारांनी विचारणा केली असता ‘मी स्वतः वैज्ञानिक दृष्टीकोनातून इंदोरीकर महाराजांना लसीचे महत्त्व पटवून देईन,’ असे प्रतिपादन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले.

बारामतीत आज बुधवारी (दि.03) आरोग्यमंत्री पत्रकारांशी बोलत होते. टोपे म्हणाले, ‘महाराजांनी लसीसंबंधी असे वक्तव्य केले असेल तर मी त्यांच्याशी नक्की बोलने. कोरोना संकटामुळे गेली दोन वर्षे किर्तनावर बंधने होती. आता किर्तने सुरु झाली आहेत. महाराजांचे व माझे प्रेमाचे, विश्वासाचे संबंध आहेत. महाराजांनी स्वतःला जरुर प्रोटेक्ट केलेले असेल किंवा मास्क, सोशल डिस्टन्सींग अशी काळजी ते घेत असतील. परंतु प्रत्येकाने लस घेणे गरजेचे आहे.’

लसीकरणासंबंधी केंद्र व राज्याच्या आकडेवारीत तफावत दिसून येत असल्याच्या प्रश्नावर आरोग्यमंत्री टोपे म्हणाले, राज्यात सात कोटी लोकांचा पहिला डोस पूर्ण झाला आहे. तर तीन कोटी नागरिकांना दुसरा डोस मिळाला आहे. संबंध राज्याच्या उद्दिष्टाच्या 73 टक्के तर दुसऱया डोसचे 34 टक्के लसीकरण झालेले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.