Pune News : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हेमंत रासने यांनी केली आरोग्य कोठीची पाहणी

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी कसबा विश्रामबागवाडा व भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत येणाऱ्या सर्व आरोग्य कोठींना प्रत्यक्ष भेट दिली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कामाची करण्यात आली. सर्व आरोग्यसेवकांचे कौतुक करून त्यांना त्यांच्या सुरक्षतेसाठी 1500 हँन्ड ग्लोजचे वाटप करण्यात आले. यावेळी नगरसेविका गायत्री खडके, नगरसेवक योगेश समेळ, अजय खेडेकर, अतिरिक्त आयुक्त शंतनु गोयल, परिमंडल 05 प्रमुख अविनाश सपकाळ, माधव जगताप, महापालिका सहाय्यक आयुक्त आशिष महाडदळकर, वरिष्ठ आरोग्य निरिक्षक सुनिल मोहिते, अशोक बंडगर व सर्व आरोग्य निरिक्षक, मुकादम व सेवक उपस्थित होते.

या आधी सुद्धा हेमंत रासने यांच्याकडून कोरोना सारख्या कालावधीमध्ये प्रत्येक आरोग्य सेवकास कोरोना किट साहित्याचे वाटप करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.