Pune News : मला कालच्या पक्ष प्रवेशाबाबत काही माहिती नाही – चंद्रशेखर बावनकुळे

एमपीसी न्यूज : गुंड शरद मोहोळची पत्नी स्वाती मोहोळ (Pune News) यांचा भाजपचे नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत काल भाजपमध्ये प्रवेश झाला आहे. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाजपवर टीका केली आहे.

त्याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे पुणे दौर्‍यावर असताना स्वाती मोहोळ यांच्या पक्ष प्रवेशाबाबत विचारले असता ते म्हणाले की, राज्यातील 1 लाख पक्षाच्या बुथवर आम्ही प्रत्येकी 25 पक्ष प्रवेश घेत आहोत. त्या पार्श्वभूमीवर मुंबईतील पक्ष कार्यालयात प्रत्येक मंगळवारी पक्ष प्रवेश होत आहे.

Pune : महाविकास आघाडीतील नेतेच अजितदादांना जाणीवपूर्वक बदनाम करत आहेत : चंद्रशेखर बावनकुळे

त्यानुसारच येणार्‍या मंगळवारी देखील साजेसा असा पक्ष प्रवेश आहे. त्यामुळे मंगळवार हा भाजपचा पक्ष प्रवेशाचा दिवस निश्चित झाला असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच ते पुढे म्हणाले की, मला कालच्या पक्ष प्रवेशाबाबत काहीही माहिती नाही. एखाद्या कार्यकर्त्यांबाबत मागील काळात काय घडले? त्याबाबत आमचे (Pune News) फार काही मत नाही.

पण, 2035 पर्यंत सर्वोत्तम भारताचा मोदींनी जो संकल्प केला आहे, त्या संकल्पनेला जो कोणी साथ देण्यास तयार असेल, त्या व्यक्तीला आम्ही पक्ष प्रवेश नाकारत नाही. त्या कार्यकर्त्याने पक्षाच्या शिस्तीत आणि देशासाठी काम केले पाहिजे. अशी भूमिका स्वाती मोहोळ यांच्या पक्ष प्रवेशावर त्यांनी मांडली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.