Moshi : बुलेटच्या धडकेत एकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – बुलेटच्या धडकेत हातगाडी चालकाचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि. 19) सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास संतनगर मोशी (Moshi) येथे घडली.

राजेभाऊ बापूराव शिंदे (वय 45, रा. आदर्शनगर, मोशी) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी काशिनाथ बापूराव शिंदे (वय 49) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सागर किसन कांबळे (वय 32, रा. संत नगर, मोशी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Maharashtra : शेतकऱ्यांनो! उन्हाळा वाढतोय पशुधनाला सांभाळा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे भाऊ राजेभाऊ शिंदे हे हातगाडा लाऊन त्यावर कुरकुरे, बॉबी विक्रीचा व्यवसाय करतात. ते बुधवारी सायंकाळी सव्वा सात वाजता संतनगर मोशी येथील महाराजा चौकात हातगाडा लाऊन थांबले असताना (Moshi) एमएच 12/एनझेड 7807 या क्रमांकाच्या बुलेटवरून आरोपी आला.

त्याने भरधाव वेगात बुलेट चालवून राजेभाऊ यांना धडक दिली. त्यात गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.