Maharashtra : शेतकऱ्यांनो! उन्हाळा वाढतोय पशुधनाला सांभाळा

एमपीसी न्यूज – ऊन वाढत असून अवकाळी पावसाचाही जोर सुरु आहे. अचानक वातावरणात बदल होऊन कधी कडक ऊन तर कधी गारांचा पाउस पडत आहे. या वातावरण बदलाचा माणसांसह जनावरांवर देखील विपरीत परिणाम होऊ लागला आहे. (Maharashtra) वाढत्या उन्हामुळे राज्यात काही ठिकाणी जनावरे दगावली आहेत. शेतकऱ्यांसोबत शेतात राबणारी तसेच शेतकऱ्यांना अर्थार्जनाचा पर्याय देणारी दुभती जनावरे डोळ्यादेखत जीव सोडत आहेत. त्यामुळे जनावरांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

वाढत्या उन्हामुळे जनावरे भरपूर पाणी पितात. अंगाची लाहीलाही झाल्याने कोरडा चारा खात नाहीत. जनावरांच्या हालचाली मंदावतात. तसेच जनावरे सावलीकडे धाव घेऊन सावलीत स्थिरावतात. जनावरांच्या शरीराचे तापमान वाढते, जोरात श्वास घेणे, भरपूर घाम येणे अशी लक्षणे दिसू लागतात. दुभत्या जनावरांची उत्पादन क्षमता कमी होते. प्रजनन क्षमता आणि रोगप्रतिकारक शक्ती देखील कमी होते.

उन्हाळ्याच्या दिवसात जनावरांना शक्यतो सकाळी व संध्याकाळी ऊन कमी असताना चरण्यास सोडावे. हवामानपूरक सुधारित गोठे बांधावेत. गोठ्याची ऊंची जास्त असावी.(Maharashtra) जेणेकरून गोठ्यात हवा खेळती राहील. छप्पराला शक्यतो पांढरा चुना अथवा रंग लावावा. तसेच त्यावर पालापाचोळा, तुराट्या, पाचट टाकावे. ज्यामुळे सूर्याची किरणे परावर्तीत होण्यास मदत होईल.

परिसर थंड राहण्यासाठी गोठ्याच्या सभोवताली झाडे लावावीत. मुक्त संचार गोठ्याचा अवलंब करावा. गोठ्यामध्ये वातावरण थंड राहण्यासाठी पाण्याचे फवारे, स्प्रिंकलर्स यासोबत पंख्याचा वापर करावा. दुपारच्या वेळेस गोठ्याच्या भोवती बारदाणे, शेडनेट लावावेत व शक्य असल्यास त्यांना पाण्याने भिजवावे, जेणेकरून उष्ण हवा गोठ्यात येणार नाही व आतील वातावरण थंड राहील. जनावरांना मुबलक प्रमाणात थंड पिण्याचे पाणी उपलब्ध करावे.

Pimpri : गुटखा विक्री प्रकरणी एकास अटक

बैलांकडून शेतीची मशागतीची कामे शक्यतो सकाळी व संध्याकाळी कमी उन्हात करून घ्यावीत. यावेळी त्यांना पाणी जास्त प्रमाणात उपलब्ध होईल याची काळजी घ्यावी.(Maharashtra) आवश्यकतेनुसार पाण्यामध्ये मिठाचा वापर करावा. उन्हाच्या ताणामुळे जनावरांची भूक मंदावते. त्यामुळे शक्यतो थंड वातावरणात त्यांना चारा टाकावा.

म्हशीच्या कातडीचा काळारंग व घामग्रंथींच्या कमी संख्येमुळे उष्णतेचा त्रास त्यांना गाईपेक्षा जास्त होतो. त्यामुळे त्यांची अधिक काळजी घ्यावी. योग्य पशुआहार, मुरघासचा वापर, निकृष्ट चाऱ्यावर यूरिया प्रक्रिया करून दिल्यास उन्हाळ्यात सुद्धा आवश्यक दुग्ध उत्पादन मिळवणे शक्य आहे.

जनावरांना वेळोवेळी जंतनाशक औषधे पाजावी, जनावरांचे नियमितपणे लाळ्या-खुरकुत, घटसर्प, फऱ्या, पीपीआर, आंत्रविषार इत्यादी रोगप्रतिबंधक लसीकरण करून घ्यावे.(Maharashtra) पशुखाद्यामध्ये मिठाचे वापर व पाण्यामध्ये इलेक्ट्रोलाइट यांचे योग्य मिश्रण करून वापरावे तसेच दुधाळ पशुंना संतुलित पशुआहारासोबत खनिज मिश्रणे द्यावेत. चाऱ्यामध्ये एकदम बदल करणे टाळावे.

पक्ष्यांच्या घरट्यामध्ये तापमान नियंत्रक व्यवस्था असावी. मृत जनावरांची विल्हेवाट लावताना ती जागा पाण्याच्या तलावापासून, सार्वजनिक ठिकाणापासून दूर व संरक्षित असावी. नियमित चराऊ कुरणाच्या ठिकाणी करू नये. मृत जनावरांची विल्हेवाट लावलेल्या ठिकाणी या संबंधीच्या आवश्यक माहितीचा फलक असावा.

कडक उन्हात जनावरांना चरायला सोडू नये.(Maharashtra) पाण्याच्या लोखंडी हौदात पाणी गरम झाले असेल तर असे पाणी पाजणे टाळावे. जनावरांना दाटीवाटीने आणि गर्दीत बांधू नये.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.