Pune News: ‘त्या’ जागेबद्दल मला डाऊट होताच’, पण बारामतीत आम्हाला चांगला लीड मिळाला – अजित पवार

एमपीसी न्यूज: पुणे जिल्हा सहकारी बँकेचा निकाल जाहीर झाला असून सात पैकी सहा जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय झाला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस मधून भाजपात गेलेले प्रदीप कंद यांनी विजय मिळवला. त्यामुळे एका जागेवर भाजपचा विजय झाला आहे. या विजयाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली असून पराभूत झालेल्या जागेबद्दल मला डाउट होताच परंतु बारामतीतुन आम्हाला चांगला लीड मिळाले असल्याचे सांगितले.

हा पराभव अजित पवार यांचा चांगलाच जिव्हारी लागला असल्याचे दिसून येते. कारण त्यांना या पराभवबद्दल विचारले असता एका जागेचं वाईट वाटतंय, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी या निकालावर व्यक्त केली आहे.

यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, निवडून आलेल्या सर्व उमेदवारांचे स्वागत करतो. परंतु एका ठिकाणी आम्ही कमी पडलो. या ठिकाणी नेमकं काय झालं होतं त्याची माहिती मी आता घेणार आहे.

या जागेबाबत मला डाऊट होताच. तिथे 11 मते कमी पडली. पण बारामतीत आम्हाला चांगला लीड मिळाला आहे, असं अजितदादा म्हणाले. तसेच मुंबई जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. मुंबई जिल्हा बँक निवडणूक ही एक पक्ष म्हणून निवडणूक नव्हती, पक्ष विरहित निवडणूक होती. पक्षाला बाजूला ठेवून त्यांनी निर्णय घेतला, असंही त्यांनी सांगितलं.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.