Pune News: छत्रपती संभाजी महाराज पूल रात्रीच्या वाहतुकीसाठी बंद

 एमपीसी न्यूज: डेक्कन परिसरातील मेट्रोचे कामकाज सुरू असल्याने वाहतूक विभागाकडून श्री छत्रपती संभाजी महाराज पुल वाहतूकीसाठी रात्री बंद करण्यात आला आहे. वाहन चालकांसाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. ५ ते १० जानेवारीपर्यंत हा पुल रात्री ११ ते सकाळी ६ पर्यंत बंद असणार आहे.

शहरात सुरू असणाऱ्या मेट्रो कामकाज सुरू असल्याने वाहतूकीत बदल करण्यात येत आहे. डेक्कन मेट्रोचे काम सुरू असून, वनाज ते सिव्हील कोर्ट दरम्यान मेट्रो रिच दोन या मार्गिकेच्या श्री छत्रपती संभाजी महाराज पुलादरम्यान पिलर क्रमांक १५५ ते पिलर क्रमांक १५६ याचे नविन गर्डर टाकण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यासाठी हा वाहतूक बदल करण्यात आला आहे. ५ ते १० जानेवारीपर्यंत हा पुल रात्री ११ ते सकाळी ६ पर्यंत वाहन चालकांसाठी बंद असणार आहे. वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी या वाहतूक बदलाचे आदेश दिले आहेत.

पर्यायी मार्ग…
– कर्वेरोडने अलका चौकात जाणारी वाहतूक गुडलक चौकातून नटराज चौक, डेक्कन पीएमटी बस स्टॉपमार्गे भिडे पुलावरून अलका चौकाकडे जाईल.
– जंगली महाराज रोड व आपटे रोडने येणारी वाहतूक खंडोजीबाबा चौकामार्गे रसशाळा चौकातून एस.एम. जोशी पुलावरून गांजवे चौकाकडे जाईल.
– लक्ष्मी रोड, टिळक रोडने येणारी वाहतूक ही रमणबाग चौक व अप्पा ब‌ळवंत चौकातून इच्छितस्थळी जाईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.