Pune News : पुण्यातील नामांकित महाविद्यालयात सराईत गुन्हेगारांचा धिंगाणा, ‘कॉलेजचा भाई मीच’ म्हणत एकाला बेदम मारहाण

एमपीसी न्यूज – पुण्यातील भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनच्या हद्दीतील सिंह सिंहगड कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स याठिकाणी एका सराईत गुन्हेगाराने धिंगाणा घातला. वर्चस्ववादातून 10 ते 11 जणांच्या टोळक्याने एका विद्यार्थ्याला लाकडी बांबू आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. शुक्रवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 

सराईत गुन्हेगार विकास उर्फ विकी चावडा याच्यासह मोहन राठोड, चेतन थोरे, साहिल गायकवाड यांच्यासह सहा अनोळखी आरोपींवरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अथर्व दीपक चौधरी (वय 19) यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंबेगाव खुर्द परिसरात हे महाविद्यालय आहे. पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार विकास याने फिर्यादी तरुणाला फोन करून बोलावून घेतले आणि इतर साथीदारांच्या मदतीने बेदम मारहाण केली. “तू माझे ऐकत का नाही? “मी या कॉलेजचा भाई आहे’ असे म्हणून जबरदस्तीने एका दुचाकीवर बसवून त्याला महाविद्यालयाच्या बाहेर नेले आणि लाकडी बांबू आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.

 

आजूबाजूच्या दुकानदार व रस्त्यावरील लोकांना मदतीला आला तर तुम्हालाही मराल अशी धमकी दिली. भारती विद्यापीठ पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक घोगरे करीत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.