Chikhali News : मारहाण करून रिक्षा चालकाची रिक्षा पळविली, आरोपीला अटक

एमपीसी न्यूज – मारहाण करून रिक्षा चालकाची रिक्षा पळविली असल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी चिखली पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. मोरेवस्ती,  चिखली येथे गुरूवारी (दि. 28) रात्री सातच्या सुमारास ही घटना घडली.

 

गौरव अनिल सरोदे (वय 25, रा. मोरेवस्ती, चिखली) असे अटक आरोपीचे नाव आहे.

रिक्षा चालक हनुमान एकनाथ निंबाळकर (वय 25, रा. ताम्हणे वस्ती, चिखली) यांनी याबाबत चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हनुमान हे गुरूवारी रात्री रिक्षामधून प्रवासी सोडून घरी जात होते. आरोपीने फिर्यादी यांची रिक्षा अडवून त्यांना मारहाण केली व रिक्षा हिसकावून पळून गेला, असे फिर्यादीत नमूद आहे. आरोपी अटक असून, चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.