Pune News : रोजगार व संपूर्ण वेतन देण्याची भारतीय मजदूर संघाची मागणी

एमपीसी न्यूज – असंघटीत व संघटीत क्षेत्रातील कामगारांसाठी रोजगार व संपुर्ण वेतन देण्याचे आदेश सरकारने द्यावेत अशी मागणी भारतीय मजदूर संघाने केली आहे. तसेच, विविध मागण्यांचे निवेदन भारतीय मजदूर संघाच्या वतीने मुख्यमंत्री व कामगार मंत्री यांना कामगार उपायुक्त विकास पनवेलकर यांच्या मार्फत देण्यात आले.

यावेळी भारतीय मजदूर संघ पुणे जिल्हाचे पदाधिकारी अर्जुन चव्हाण, बाळासाहेब भुजबळ, उमेश विस्वाद व सचिन मेंगाळे उपस्थित होते.

लाॅकडाऊनचा उद्योगांवर विपरीत परिणाम झाला यामुळे विविध क्षेत्रातील कामगारांचे हाल झाले. मालकांनी सरकारच्या आदेशानुसार संपुर्ण वेतन दिले नाही. कामगारांना हक्काचे वेतन, ग्रजुईटी यासाठी संघर्ष करावा लागत आहे. त्यामुळे शासनाने याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल,  असा इशारा भारतीय मजदूर संघांने दिला आहे.

या आहेत प्रमुख मागण्या

_MPC_DIR_MPU_II

– स्थलांतरीत कामगारांसाठी निवासी व्यवस्था, रेशन, औषधे व प्रवासाची सोय करण्यात यावी

– असंघटीत कामगारांना दरमहा पाच हजार रुपये द्यावेत.

– लाॅकडाऊनच्या नावाखाली कोणत्याही कायम अथवा कंत्राटी कामगारांना कामावरून कमी करु नये, तसेच संर्पूण वेतन बाबतीत महाराष्ट्र शासनाने आदेश काढावेत.

– ईएसआय योजनेमार्फत सर्व कामगारांची कोव्हीड बाबतीत चाचणी, लसीकरण, उपचार करण्यात यावेत.

– लाॅकडाऊन कालावधीत त्रिपक्षीय रचना करून टास्क फोर्सची स्थापना करून कामगारांचे प्रश्न सोडवावेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.