Pune crime News : वाकडेवाडी येथील घरफोडीत 21 लाखांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज – बंद फ्लॅटचे कुलूप तोडून तब्बल 21 लाखांचा ऐवज चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. घरफोडीचा हा प्रकार 14 सप्टेंबर सायंकाळी 7.30 ते 15 सप्टेंबर मध्यरात्री 2.30 च्या दरम्यान भाले इस्टेट, वाकडेवाडी येथे घडला.

याप्रकरणी फ्लॅटधारक प्रशांत आमिनभावी ( वय 50,रा.वाकडेवाडी, पुणे ) यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आमिनभावी यांचा राहता फ्लॅट कुलूप लावून बंद होता. फ्लॅट बंद असताना चोरट्याने त्यांच्या फ्लॅटच्या मुख्य दरवाजाचे कुलूप कशाचे तरी सहाय्याने उचकटले.

त्यानंतर दारावाटे फ्लॅटमध्ये प्रवेश करून बेडरूमच्या कपाटातील तीन लाख रुपये रोख रक्कम व सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण 21 लाख 20 हजार किंमतीचा ऐवज घरफोडी चोरी करून नेला.

खडकी पोलीस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.