Pune News : कामगार पुतळा येथील झोपडपट्टीची जागा मेट्रो घेणार ताब्यात; सोमवारपासून होणार कार्यवाही

एमपीसीन्यूज : शिवाजीनगर, कामगार पुतळा येथील झोपडपट्टीधारकांचे विमानगर व हडपसर येथे पुनर्वसन करून सध्याची तेथील झोपडपट्टीची संपूर्ण जागा मेट्रोच्या ताब्यात देण्याची कार्यवाही सोमवारपासून सुरू करण्यात येणार आहे. झोपडपट्टी धारकांच्या जागा ३१ मे पर्यंत मेट्रोच्या ताब्यात जाणार आहेत.

या भागातील नागरिकांना विमाननगर आणि हडपसर पालिकेकडून सदनिका उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे सोमवारी पालिकेकडून संयुक्तपणे कार्यवाही करण्यात येणार असल्याचे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण यांनी ही माहिती दिली.

महापालिकेच्या आदेशानुसार,सोमवारपासून सदनिकांच्या वितरणाचे काम सुरू होत आहे. पहिल्या टप्प्यात विमाननगर येथील घरे देण्याचे काम सुरू होईल. त्यानंतर हडपसरच्या सदनिकांचे वाटप करण्यात येईल. त्यानुसार झोपडपट्टी धारकांना कळवण्यात येणार आहे.

सध्या कोरोनामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये संचारबंदी आहे. त्यामुळे कुठेही गर्दी न होण्याचे भान ठेवून सदनिका वितरणाचे काम केले जाणार आहे.

शिवाजीनगर कोर्टाजवळ विशेष नोंदणीकरण विभागाची पथके नेमण्यात येणार आहेत. सोमवारपासून नोंदणी झाल्यावरच सदनिका वाटप करण्यात येईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.