शनिवार, ऑगस्ट 20, 2022

Pune News: पुण्याच्या सदाशिव पेठेत एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या

एमपीसी न्यूज: पुण्याच्या सदाशिव सदाशिव पेठेतून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका तरुणाने राहत असलेल्या खोलीत विष प्राशन करून  आत्महत्या केली. अमर मोहिते (वय 31) असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. मूळच्या सांगली जिल्ह्यातील तासगावचा तो रहिवासी होता.. आज सकाळच्या सुमारास ही घटना घडली.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, अमर हा मागील काही वर्षांपासून पुण्यात राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा अभ्यास करत होता. काही दिवसांपूर्वी झालेल्या राज्य लोकसेवा आयोगाच्या शारीरिक परीक्षेतून तो बाहेर पडला होता. तेव्हापासून त्याला नैराश्य आले होते. याच नैराश्यातून त्याने आज सकाळच्या सुमारास राहत्या खोलीत विष प्राशन करून घेऊन आत्महत्या केली. कोरोना काळात अनेकदा राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. यामुळे देखील त्याला नैराश्य आले होते.

स्वप्निल लोणकर या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याने काही दिवसांपूर्वी आत्महत्या केल्यानंतर स्पर्धा परीक्षेचा मुद्दा पुढे आला होता. तेव्हा राज्य सरकारवर चारी बाजूने प्रचंड टीका करण्यात आली होती.

spot_img
Latest news
Related news