Pune News : मुंडे यांच्याविषयी सरकार सात दिवसात निर्णय घेऊन कारवाई करणार : निलम गोऱ्हे

एमपीसी न्यूज : धनंजय मुंडे हे 2010 पर्यंत भाजपबरोबरच होते. तेव्हा त्यांची 2 लग्न झाली होती. हे भाजपला माहित होते. मग आता त्यांच्या राजीनाम्यासाठी भाजप एवढे अग्रेसर का? परंतु आमचे सरकार अयोग्य गोष्टी चे समर्थन कधीच करणार नाही. मुंडे यांच्याविषयी सरकार सात दिवसात निर्णय घेऊन कारवाई करणार आहे,  अशी माहिती विधान परिषदेच्या उपसभापती आमदार निलम गोऱ्हे यांनी यांनी दिली.

पुणे श्रमिक पत्रकार संघात पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

आ. निलम गोऱ्हे म्हणाल्या, राज्यातील 14 हजार ग्रामपंचायतींचे निकाल समोर येणार आहेत. आता फक्त 2 हजार ग्रामपंचायतचे निकाल समोर आले आहेत. यात भाजप 414 व शिवसेना 404 जागा वर विजयी झाली आहे. या नंतर राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत. यावरुन आमचा पक्षाचा नंबर वर आला आहे. हे यश म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या कामाची पूर्ती आणि शिवसैनिकांच्या कामाची किर्ती आहे. शिवसेना कोणी तरी संपवू शकते हा भ्रम होता. असे म्हणणाऱ्यांचा या निकालांवरुन भ्रमनिरास झाला, असे मत त्यांनी व्यक्त केले.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या गावात शिवसेना निवडणूक येणे हे भाजपच्या विषारी प्रचाराला जनतेने दिलेले चोख प्रत्युत्तर आहे. महाराष्ट्रात मोदी पेक्षाही उद्धव ठाकरे लोकप्रिय आहेत. भाजपद्वारे राष्ट्रपती राजवट आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. यावर ग्रामपंचायत निवडणुकीतून जनतेने आघाडी सरकारला चांगला प्रतिसाद दिला आहे. कोल्हापूर, कोकण, मराठवाड्यात शिवसेनेचा चांगला विजय झाला आहे. शिवसेने कडून कधीही बाहुबली चे राजकारण केले जात नाही.

ग्रामविकासासाठी महाराष्ट्र शासन नेहमी उभे राहिल. येणाऱ्या निवडणुकांमधून शिवसेना मोठ्या संख्येने निवडून येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.