Pune News : रेल्वे पास कागदपत्रे पडताळणीसाठी पालिकेकडून 16 कर्मचाऱ्यांनची नियुक्ती

एमपीसी न्यूज – स्‍वातंत्र्य दिनापासून सामान्‍यांचा रेल्‍वे प्रवास सुरु झाला आहे. कोविड लसीकरण पडताळणी आणि त्याआधारे रेल्‍वे प्रवासास परवानगी दिली जाणार आहे. मात्र, संबंधित नागरिकांच्या लसीकरणाच्या प्रमाणपत्राची आणि त्यांच्या छायाचित्राची पडताळणी करण्याची जबाबदारी महापालिकेवर देण्यात आली. त्यामुळे पालिकेने शिवाजीनगर रेल्वे स्टेशन आणि पुणे स्टेशन इथे प्रत्येकी 8 कर्मचाऱ्यांनचे पथकांची नेमणूक केली आहे.

ज्या नागरिकांचा कोरोना लसीचा दुसरा डोस घेऊन 14 दिवस पूर्ण झाले आहेत. त्यांना रेल्वेने प्रवास करण्यास मुभा देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. मात्र, संबंधित नागरिकांच्या लसीकरणाच्या प्रमाणपत्राची आणि त्यांच्या छायाचित्राची पडताळणी करण्याची जबाबदारी महापालिकेवर देण्यात आली. त्यासाठी पुणे रेल्वे स्टेशन येथे सहायक आयुक्त ज्ञानदेव सुपे यांची नेमणूक केली असून या ठिकाणी आठ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे.

शिवाजीनगर रेल्वे स्टेशन येथे सहायक आयुक्त राजेंद्र रेंगडे यांची नेमणूक केली असून या ठिकाणीही आठ कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. सकाळी सात ते सायंकाळी सात या वेळेत हे सर्व कर्मचारी ज्‍या सर्वसामान्‍य नागरि‍कांना कोविड लसीचे दोन डोस घेतल्‍यानंतर 14 दिवस पूर्ण झाले आहेत, त्‍यांचे लसीकरण अंतिम प्रमाणपत्र आणि छायाचित्र असणारे ओळखपत्र पडताळणार आहेत. या ऑफलाईन पडताळणीमध्‍ये पात्र ठरलेल्‍यांना रेल्वेकडून मासिक पास दिला जात आहे. त्याआधारे उपनगरीय रेल्‍वे प्रवासाची मुभा देण्‍यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.