Pune News : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची मदतीची तयारी : चेतन तुपे

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे 42 नगरसेवक 10 लाख रुपये पेक्षा जास्त निधी द्यायला तयार असल्याचे शहराध्यक्ष आणि आमदार चेतन तुपे पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

यावेळी माजी महापौर प्रशांत जगताप, विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, नगरसेवक बाबुराव चांदेरे, वैशाली बनकर, भैयासाहेब जाधव, अश्विनी कदम उपस्थित होत्या.

चेतन तुपे म्हणाले, राष्ट्रवादी शिष्टमंडळाने आयुक्ताची आज भेट घेतली. लसीचे असमान वाटप, 6 लाख पुणेकर, लस नियोजन, यावर दीड तास चर्चा केली. शहरात182 केंद्र आहेत. 12 हजार नागरिक मागे केंद्र सुरू होणार आहे. मे महिन्यात जुन्याच लोकांमध्ये लसीकरण होईल. मात्र, कोरोना आटोक्यात आणण्यासाठी नवीन लोकांना लस द्यावीच लागणार आहे.

घरेलू, झोपडपट्टी, कामगार 45 टक्के आहेत. त्यांच्याकडे रजिस्ट्रेशन अत्यल्प आहे. यांच्या सोईसाठी फिरते लसीकरण केंद्र सुरू करा, अशी मागणी केली. आयुक्तांनी विचार करायला सांगितले. मनपा समाज मंदिरात लसीकरण करावे, आमदार तुपे आणि सुनील टिंगरे यांच्या निधीतून ऑक्सिजन प्लांट करणार आहे.

पालकमंत्री दर शुक्रवारी बोलावितात, पण, महापौर नगरसेवकांना बैठकीला बोलावीत नाही. पुण्यात 40 ते 55 लाख नागरिक लसीकरण करावी लागणर आहे, कोणत्याही घटकाने अडथळा आणू नये, सामंजस्यने काम करावे, प्रशासन असो वा सत्ताधारी! दरम्यान, नगरसेवक बैठक घ्यावी, म्हणून आम्ही वारंवार मागणी करीत आहोत, महापौरांना पत्रही दिले, पण काहीही प्रतिसाद मिळाला नसल्याचे दीपाली धुमाळ यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.