Pune News : राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटील यांची फेसबुकवर बदनामी, गुन्हा दाखल 

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या फायरब्रँड नेत्या रुपाली पाटील-ठोंबरे यांची सोशल मीडियावर बदनामी केल्याप्रकरणी 16 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्तेे असल्याचे सांगितले जाते. फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी ऍड. पुनम काशिनाथ गुंजाळ (वय 27) यांनी तक्रार दिली आहे. 

सागर चव्हाण, गजानन पाटील, प्रसाद राणे, धृवराज ढकेडकर, राजेश दंडनाईक, कुमार जाधव, सचिन कोमकर, सावळ्या कुंभार, निजामुद्दीन शेख, सुधीर लाड यांच्यासह आणखी सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फेसबुकवर ‘एक करोड ताईवर नाराज असणाऱ्यांच्या ग्रुप’ तयार करण्यात आला. यावर रुपाली ठोंबरे यांचा विनापरवानगी फोटो वापरण्यात आला आहे. या ग्रुप वरच अश्लील भाषा वापरत त्यांची खिल्ली उडवण्यात आली आहे. फिर्यादी यांनी महिलेविषयी अश्लील भाषेत बोलू नका अशी विनंती केल्यानंतरही आरोपी सुधीर लाड याने पर्सनल फेसबुक अकाउंटवरून रूपाली ठोंबरे यांना शिवीगाळ करत असल्याचा लाईव्ह व्हिडिओ टाकून बदनामी केली. फरासखाना पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक सय्यद करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.