Pune News : नृत्यतेज अकॅडमीचे ऑनलाईन शिबिर उत्साहात ; नृत्य क्षेत्रातील दिग्गजांची उपस्थिती

एमपीसी न्यूज – नृत्य क्षेत्रातील दिग्गजांच्या उपस्थितीत नृत्यतेज अकॅडमीचे ऑनलाईन शिबिर उत्साहात पार पडले. एकूण 75 लोकांनी या शिबिरासाठी ऑनलाईन उपस्थिती लावली होती. तर, 36 विद्यार्थ्यांनी शिबिराचा लाभ घेतला. यावेळी वेगवेगळ्या नृत्यछटा सादर करण्यात आल्या.

यावेळी झी वाहिनीवरील ‘एका पेक्षा एक’ या डान्स रिॲलिटी शोचा विजेता मयुरेश पेम, ‘कच्चा लिंबू’ या राष्ट्रीय पारितोषिक विजेत्या चित्रपटातील मुख्य कलाकार मनमित पेम यांनी आपले मनोगत व्यक्त केले. राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय टायटल विजेती सुप्रिया धयींजे यांनी नृत्यकला मंदिर व गुरू तेजश्री अडीगे यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली.

शर्वरी कुदळे यांनी गणेश वंदना सादर केली, नृत्यकला मंदिरच्या संस्थापक संचालिका तेजश्री अडीगे यांनी रामचंद्र भजमी रचना सादर केली तर, मनाली गोवंडे कानिटकर यांनी ‘रघुकुल रीत सदा चली आई’ या गितावर नृत्य सादर केले.

ऑनलाईन नृत्य शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी 75 पेक्षा अधिक लोकांनी उपस्थिती लावली होती. ‘डान्स महाराष्ट्र डान्स’ रिॲलिटी शोचा विजेता पुण्यकर उपाध्याय याने देखील यावेळी गूजरात मधून हजेरी लावली होती. 36 विद्यार्थ्यांनी शिबिराचा लाभ घेतला. लायन्स क्लबच्या कार्यकारी अधिकारी उमा पाटील यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.