Pune News: इनोव्हेटीव्ह वर्ल्ड स्कूल मध्ये विविध सांस्कृतिक, सामाजिक, धार्मिक एकतेचे दर्शन ” – निवृत्त ब्रिगेडियर  मदन बिष्ट

एमपीसी न्यूज: चिखली-मोशी येथील इनोव्हेटीव्ह वर्ल्ड स्कूलच्या वतीने चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे सभागृहामध्ये वार्षिक स्नेहसंमेलना निमित्त आयोजित केलेल्या तिसऱ्या वार्षिक स्नेह संम्मेलन ” यात्रा २०२१-२२” , कार्यक्रमात ते बोलत होते.निवृत्त ब्रिगेडियर मदन बिष्ट यांनी यशासाठी तीन मंत्र दिले. सक्षमता, वचनबद्धता आणि कार्यप्रदर्शन. ते म्हणाले की, या तीनही गोष्टींवर तुम्ही लक्ष केंद्रीत केले पाहिजे. ते तुम्हाला नेहमी यशाकडे घेऊन जातील.

तसेच शाळेमध्ये गेली तीन वर्षे उत्कृष्टपणे सुरू असलेल्या अभ्यासक्रमास, विविध सामाजिक सांस्कृतिक उपक्रमास, विद्यार्थ्यांच्या सर्वगुणसंपन्न विकासास इनोव्हेटीव्ह वर्ल्ड स्कूलच्या व्यवस्थापनाचे सहकार्य, शिक्षकांचे योगदान आणि पालकांचा सहभाग लाभला त्याबद्दल त्यांचे कौतुक केले.

संचालिका कमला बिष्ट यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे पालकांना उद्देशून, शाळेचा वार्षिक अहवाल सादर केला.

निवृत्त ब्रिगेडियर श्री. मदन बिष्ट यांना शाळा व्यवस्थापनाच्या वतीने स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारची भीती मनातून काढून निडरपणे सामोरे जाऊन दुष्ट शक्तींना दूर ठेवा असा मौलिक सल्ला संचालक डॉ. संजय सिंग यांनी दिला.

किरण बिष्ट यांनी स्नेहसंमेलनात आपल्या चिमुकल्यासह नृत्य प्रकारात सहभाग घेतलेल्या आई बाबांचा सत्कार केला. गणेश वंदनेने सुरू झालेल्या कार्यक्रमाची सांगता वंदेमातरम गीताने झाली. विद्यार्थ्यांनी कोरोना काळात बंद असलेल्या शाळा पुन्हा सुरू होत आहे या पार्श्वभूमीवर, “स्कूल चले हम” या नाट्याने विद्यार्थी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

कौटुंबिक बंधन, वडिल एक देवदूत, आई आणि मूल यांचे प्रेम या कौंटूंबिक गीतांनी उपस्थितांची मने हेलवली. प्लास्टिकच्या नियमित वापरामुळे समाजावर होणारे दुष्परिणाम दाखविण्यासाठी सादर केलेले पथनाट्य, पृथ्वीचे घटक असणारे पाणी, सूर्य आणि वारा यांचे प्रत्येक व्यक्ती प्रती असणारे महत्व, विकृतींचा नाश करण्याची इच्छा, बालमजूरीला विरोध आदी नाट्यगीते एक प्रकारे सामाजिक संदेश देऊन गेली.

महाराष्ट्रातील विविधतेचे दर्शन, विठ्ठल नामाचा जयजयकार, आई भवानीचा उदोउदो आदी अंगावर शहारे आणणारे आणि स्फुरण देणारे होते. विविधतेची एकता या नृत्यात सर्व धर्म, प्रांत, भाषा या भारतीय आहेत आणि त्याचा आम्हास अभिमान आहे असा संदेश देऊन गेला.

गोव्याचे लोकनृत्य, भरतनाट्यम नृत्य, आदी विविध सामाजिक, धार्मिक, भाषिक, सांस्कृतिक विषयावर सादर केलेले नाट्यप्रयोग, नृत्यगीते डोळ्याचे पारणे फेडवणारी होती.

प्रत्येक भाग सुरू होण्यापूर्वी छोट्या विद्यार्थ्यांनी केलेले सूत्रसंचलन हे नेतृत्व गुण करण्याची एक नवी शिकवण देऊन गेली.नृत्य, पथनाट्य, नाटके सुरू असताना पडद्यावर लावण्यात आलेले स्क्रीन, वेळोवेळी बदलत असणारे ग्राफिक्सने एखाद्या चित्रपटातील दृष्याचा अनुभव दिला.

पालकांनी टाळ्यांच्या गजरात विद्यार्थ्यांचे मनोबल उंचावले. इनोव्हेटीव्ह वर्ल्ड स्कूल मुळे विद्यार्थ्यांचे गुण कौशल्य अप्रतिम झाल्याचे पालकांनी आमच्या वृत्त वाहिनीशी बोलताना सांगितले.

यावेळी संचालक डॉ. संजय सिंग, गट शिक्षण अधिकारी श्री. अशोक गोडसे, डॉ. संजय झोपे, डॉ. अजित थिटे, श्री. विकास साने, श्री. प्रशांत पाटील, श्री. विजय शिर्के, श्री. विद्यानंद मानकर तसेच विद्यार्थ्यांचे आजी-आजोबा, आई-बाबा, बहीण-भाऊ आदी उपस्थित होते.

कोविड नियमांचे पालन करून स्नेहसंमेलन साजरा करण्यात आलादेबोश्री भोंडवे, चंद्रकला कापरी, निशा पाटील, प्रीती साबने, अदिती एकवडे, प्रेमलता केंजळे, तन्वी नाशिकर, अनुराधा डिक्कर, रोहिणी भोसले, तमाळी डे, निरुपमा काकडे, संसिया लूद्राज, सुजाता शेलार, तेजश्री शिंदे , सिद्धी सावंत, कल्यानी साजन, शोभना सिंग आणि पुष्कर कापरी आदी शिक्षिकांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.