Pune News: कात्रज आगारात गुणवंत कामगारांचा व पदोन्नती मिळालेल्या अधिकाऱ्यांचा सत्कार

सेवानिवृत्त होत असलेल्या अधिकारी, कर्मचा-यांचाही सन्मान

एमपीसी न्यूज – पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या कात्रज आगारामध्ये शुक्रवारी (दि. 24) गुणवंत कामगार, मार्गावर उच्चांकी उत्पन्न आणणारे चालक-वाहक सेवक, वर्कशॉप विभागातील उत्कृष्ट कामगिरी करणारे कर्मचारी, नव्याने पदोन्नती मिळालेले अधिकारी, सेवानिवृत्त होत असलेले अधिकारी, कर्मचारी यांचा प्रशस्तिपत्र, सन्मानचिन्ह, व्हेपर इनहेलर व भेटवस्तू देवून सत्कार करणेत आला.

परिवहन महामंडळाचे चिफ डेप्युटी मॅनेजर (अॅडमिन) नितिन घोगरे यांच्या हस्ते सर्व सत्कारमुर्तीचे यथोचित सत्कार करण्यात आले. याप्रसंगी कात्रज डेपो मॅनेजर विजय रांजणे, असिस्टंट डेपो मॅनेजर शैलेंद्र जगताप, डी.एम.ई. सचिन वाबळे, जाणता राजा प्रतिष्ठानचे आदित्य बोरगे यांच्यासह कात्रज डेपोतील अधिकारी वर्ग यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी कात्रज आगारातील सेवानिवृत्त होत असलेले वरिष्ठ लिपीक मनोज आढाव व स्वच्छता कर्मचारी आशा घुमे यांचा प्रशस्तिपत्र, सन्मानचिन्ह व्हेपर इनहेलर व भेटवस्तू देवून सत्कार करण्यात आला. तसेच उच्चांकी उत्पन्न आणणारे चालक-वाहक सेवक तसेच सकाळ व दुपार शिफ्ट मधील उत्कृष्ट हजेरी असणारे सेवक, प्रवाशांना सौजन्यपूर्ण सेवा देणारे चालक-वाहक सेवकांच्या 10 जोड्यांचा प्रशस्तिपत्र, सन्मानचिन्ह व्हेपर इनहेलर, प्रथमोपचार पेटी व भेटवस्तू देवून सत्कार करणेत आला.

तसेच कात्रज आगाराकडील नव्याने पदोन्नती मिळालेले असिस्टंट डेपो मॅनेजर शैलेंद्र जगताप, डी.एम.ई. सचिन बाबळे, टाईम कीपर प्रकाश क्षीरसागर, गॅरेज सुपरवायझर विवेक हारजीत, असिस्टंट गरज सुपरवायझर अशोक जगताप, असिस्टंट टाईम कीपर धनंजय कदम व बाळासाहेब थोरात, कनिष्ठ लिपीक प्रविण टेके यांचा व गरज सुपरवायझर आणि टाईम कीपर मदतनीस याचाही शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.

तसेच वर्कशॉप विभागाकडील उत्कृष्ट कामगिरी करणारे फिटर अरुण चोरघे, गंगाराम शिरोळे, बॉडी फिटर निलेश भालेराव यांचा प्रशस्तिपत्र, सन्मानचिन्ह व भेटवस्तू देवून सत्कार करणेत आला. कार्यक्रमाचे उत्कृष्ट संयोजन केल्याबद्दल चालक संतोष सुतार, वाहक निखील नवले यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करणेत आला.

याप्रसंगी ‘कात्रज सर्पोद्यान स्थानक’ या नामफलकाचे उद्घाटन परिवहन महामंडळाचे चिफ डेप्युटी मॅनेजर (अॅडमिन) नितिन घोगरे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच दरमहा उच्चांकी उत्पन्न आणणारे चालक-वाहक सेवकांचा व वर्कशॉप विभागाकडील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सेवकांचा सत्कार करणार असल्याचे कात्रज डेपो मॅनेजर विजय रांजणे, असिस्टंट डेपो मॅनेजर शैलेंद्र जगताप व डी.एम.ई. सचिन बावळे यांनी जाहीर केले. यावेळी उपस्थित सर्व अधिकाऱ्यांनी पीएमपीएमएलचे प्रतिदिन उत्पन्न रूपये 2 कोटी आणण्याच्या उद्दिष्टाबाबत कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमास कात्रज आगारातील लिपीक शिवाजी जाधव, राजाराम येनपुरे, दत्तात्रय जोरकर, सर्व युनियनचे पदाधिकारी यांचेसह कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक असिस्टंट डेपो मॅनेजर शैलेंद्र जगताप यांनी केले. कात्रज डेपो मॅनेजर विजय राजणे यांनी आभार मानले. लिपीक सतिश पासलकर यांनी सूत्रसंचालन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.