Chinchwad News: श्री मोरया गोसावी भक्तांसाठी करण्यात आलेल्या विविध सोयी सुविधांच्या कामाचे लोकार्पण

एमपीसी न्यूज – विकासात्मक कामे करण्यासाठी समन्वय आणि सातत्य महत्त्वाचे असते. अशावेळी अध्यात्माची जोड मिळाल्यास काम करण्यासाठी अधिक ऊर्जा प्राप्त होते, असे प्रतिपादन महापौर उषा  ढोरे यांनी केले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने चिंचवड येथे श्री मोरया गोसावी भक्तांसाठी देऊळमळा परिसरामध्ये करण्यात आलेल्या विविध सोयी सुविधांच्या कामाचा लोकार्पण समारंभ महापौर ढोरे यांच्या हस्ते आज (शनिवारी) पार पडला. त्यावेळी त्या बोलत होत्या. चिंचवड येथील मोरया गोसावी मंदिर परिसरात संपन्न झालेल्या या कार्यक्रमास ब प्रभाग अध्यक्ष सुरेश भोईर, स्वीकृत नगरसदस्य अँड. मोरेश्वर शेडगे, नगरसदस्या अपर्णा डोके, अश्विनी चिंचवडे, माजी नगरसदस्य शंकर जगताप, राजू गोलांडे, कार्यकारी अभियंता प्रशांत पाटील, नितीन देशमुख, क्षेत्रीय अधिकारी अभिजित हराळे आदींसह नागरिक उपस्थित होते.

सुमारे 60 लाख रुपये खर्च करुन चिंचवड येथे श्री मोरया गोसावी भक्तांसाठी देऊळमळा परिसरामध्ये मुंख्य स्टेज, पदपथ, सिटींग गॅलरी आणि 14 हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी तसेच इतर कामे करण्यात आली आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.